IIजय भवानी II

 

सर्व मावळे आणि मावळीणींना सप्रेम दंडवत.

गेली चारशे वर्षे ज्यांचे शौर्य आणि  राजकारणातील कौशल्य साऱ्या जगात वाखाणले जाते असे राजे शिवाजी महाराज, त्यांच्या शिरावर सतत आशीर्वादरूप असणारी भवानीमाता आणि जिजामाता,या तेजस्वी इतिहासाकडून स्फूर्ती घेऊन शिवभक्त ब. मो. पुरंदरे यांनी भव्य अशी कलाकृती साकारली ती म्हणजे “जाणता राजा”.

ही कलाकृती ह्युस्टनवासियांनी सादर करण्याचे मनावर घेतले. पण प्रत्यक्षात हे शिवधनुष्य पेलणे हे येरागबाळ्याचे काम नव्हते; अनेक हातांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीनेच हे शक्य झाले. खरोखरच आनंद जावडेकर आणि अभिषेक जाधव या दोन्हीही कुशल दिग्दर्शकांच्यामुळे आपण “जाणता राजा” हा अतिभव्य प्रयोग अतिशय सुंदरपणे प्रदर्शित केला आहे, असे आता अभिमानाने सांगू शकतो.

अभिषेक भट, राहुल देशमुख,आणि चैत्राली गोखले-थोटे यांनी खूप मेहनत केली, अति कष्ट केले.  राजगुरू,कुलकर्णी, आणि करंदीकर कुटुंबियांनी मदत तर केलीच; त्याच्या अनुभवाचा पाठींबा तितकाच महत्त्वाचा होता. HMMcommittee members आणि board of directors यांचाही या शुभकार्याला संपूर्ण सहकार होता.

खर तर मला प्रत्येक कलावंताचे नाव लिहायचा मोह आवरत नाही;त्यांनी  प्रत्येक शनिवारी रविवारी केलेल्या बारा-बारा तासांच्या practiceआणि रात्रंदिवस एक करून तयार केलेलं ते अवाढव्य स्टेज …सर्व अगदी अद्भूत होते; या मध्ये आठ वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत सर्व वयोगटाचा समावेश होता. Elementary school आणि High school मधील मुले होती, कॉलेज मधील juniors, seniorsहोते, graduates,post graduates, doctors, engineers, scientists, professors, teachers, editors, writers, सर्व कुणी होते. हो, लग्नाळू होते; आणि मुख्य म्हणजे खूपश्या homeministers सुद्धा होत्या. जणू घरातील लग्न सोहळ्याची आपण तयारी करीत होतो.

“जाणता राजाच्या” प्रभावाने सर्वांची मने भारावली होती. एक सुंदर एकजूटीचा माहोल निर्माण झाला होता. आता महाराजांच्या सारखेच एक मोठे स्वप्न “आपल्या वास्तूचे” आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक ह्युस्टनवासियाने प्रयत्न करावे अशी इच्छा आहे; आणि खात्रीही.

सर्व मावळ्याना आणि त्यांच्या कुटुंबियांना असे आव्हान करावेसे वाटते की नव्या दमाच्या उत्साही तरुण पिढीने पुढे येऊन हे “शिवधनुष्य” खांद्यावर घेतले तर आपल्या सर्वांची स्वप्नपूर्ती लवकरांत लवकर होऊ शकेल यात तिळमात्र शंका नाही.

जय शिवाजी!

जय भवानी!

जय महाराष्ट्र!

 

-प्रमोद मेहता

Pin It on Pinterest

Share This